भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे स्वागत व अभिनंदन.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार नयोमी दशरथ साटम यांनी स्विकारल्यावर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, जिल्हा पदाधिकारी मेघा गांगण, जिल्हा मोर्चा उपाध्यक्ष सावी लोके, वैभववाडी मंडल अध्यक्ष प्राची तावडे, कणकवलीच्या हर्षदा वाळके, आरती पाटील, ओसरच्या सुप्रिया वालावलकर, वेंगुर्लेच्या सुजाता पडवळ, सावंतवाडीच्या मोहिनी मडगावकर, साधना माडिये आदी उपस्थित होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)