महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी किसन मांजरेकर नियुक्त.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी किसन मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना अध्यक्ष अनिल पडवळ यांच्या स्वाक्षरीने किसन मांजरेकर यांना सुपूर्द करण्यात आले आहे.
किसन मांजरेकर यांनी यापूर्वी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस म्हणून पक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळली आहे. आता महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली असून त्यांचे अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)