ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
जिल्हाधिकारी कार्यालयात सैनिक दरबाराचे २२ जुलै रोजी आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्हाधिकारी कार्यालयात सैनिक दरबाराचे २२ जुलै रोजी आयोजन.

प्रकाशन: 08 Jul 2025 10:56 PM
वाचन संख्या 61

सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरपिता, वीरमाता व अवलंबिताना यांच्या कुंटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरपिता, वीरमाता यांच्या कुंटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी, महसुल, पोलीस यंत्रणा, नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती विषयी कोणत्याही समस्या असल्यास त्या विषयाचे अर्ज १५ जुलै २०२५ पूर्वी लेखी स्वरुपात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करावेत.

जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी,वीरनारी, वीरपिता, वीरमाता यांच्या कुंटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी, महसुल, पोलीस यंत्रणा, नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती विषयी समस्या निवारणासाठी सदर सैनिक दरबाराकरीता उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02362 228820, 8219285788 वर सपंर्क करावा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स