ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त 'कौशल्य सप्ताहा'चे आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त 'कौशल्य सप्ताहा'चे आयोजन.

प्रकाशन: 09 Jul 2025 10:58 PM
वाचन संख्या 67

सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : १५ जुलै २०२५ रोजी साजरा होणाऱ्या ‘जागतिक युवा कौशल्य’ दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कौशल्य सप्ताह (दि. ७ ते १५ जुलै २०२५) दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अ.ई. तडवी यांनी दिली आहे.

या उपक्रमांतर्गत ८ जुलै २०२५ रोजी जन शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने वर्ष २०२५ च्या पहिल्या कौशल्य विकास बॅच ‘सहायक ड्रेस मेकर’ या प्रशिक्षण बॅचचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या समारंभासाठी प्रमुख अतिथी कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त, भैयाजी येरमे, तसेच कौशल्य विकास व रोजगार अधिकारी सूरज देबाजे व भारत सरकार श्रम व रोजगार मंत्रालय, समुपदेशक निखिल दवणे आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गचे संचालक सुधीर पालव यांनी केले आणि प्रशिक्षण बॅचचे औपचारिक उद्घाटन केले.
कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना श्री. येरमे यांनी कौशल्य विकास, रोजगार संधी, तसेच स्वयंरोजगार याबाबत उपयुक्त माहिती दिली. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षणांमधून मिळणारे कौशल्य आणि त्या आधारे निर्माण होणाऱ्या संधींबाबत माहिती देऊन प्रशिक्षणार्थीमध्ये नवीन आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण केली.
उपस्थित उमेदवारांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि भविष्यातील करिअरसाठी योग्य दिशादर्शन झाल्याचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. येरमे यांनी सर्व प्रशिक्षणार्थीना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स