ताज्या बातम्या
श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन. कसाल येथे १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन. मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या ॲथलीटसची चमकदार कामगिरीसह जिल्हास्तरावर धडक..! मालवणात १८ ऑक्टोबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे आयोजित ‘दुर्गा माता दौड' मध्ये सहभागाचे आवाहन. तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत बागवे हायस्कूलचे यश. कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन. कणकवलीत गिरिजा प्रभुदेसाई यांचा 'कथक' नृत्य वंदना कार्यक्रम. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात. पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये जमा करायचे निर्देश : मुख्यमंत्र्यांची माहिती
श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)

श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन.

श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन.

Article image

कुडाळ | ब्यूरो न्यूज : नुकतीच, कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील उदयोन्मुख सिंधुयुवती दिवंगत दामिनी पालव हिच्या निर्घृण खूनाची माणुसकीला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवून संताप, चीड आणि अतीव वेदना देणारी घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या वर्दे येथील दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन, शिवसेना जिल्हाप्रमुख व उद्योजक दत्ता सामंत यांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांना धीर देत दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

   

या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून संशयिताला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि समाजात योग्य संदेश जावा, यासाठी या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले.

   

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, सभापती मिलिंद नाईक, संजय पडते, देवेंद्र नाईक, अरविंद करलकर, पंचायत समिती सदस्य नागेश आईर, पंचायत समिती सदस्या श्रावणी तेरसे, घनश्याम तेरसे, कीर्तीकुमार तेरसे, स्वरूप वाळके, काका कुडाळकर, विनायक राणे, सागर पालव, वर्देचे पोलीस पाटील तसेच कडावल - वर्दे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत

लोकप्रिय टॅग्स