कसाल येथे १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन.
कसाल येथे १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या कसाल येथे घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग आयोजित पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. घुंगुरकाठी संस्थेच्या वतीने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी कसाल हायस्कूल येथे हे संमेलन भरविण्यात आले आहे. या संमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ५० साहित्यिक, कवी यांची उपस्थिती असणार आहे.
यावेळी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर व उद्घाटकपदी रंगकर्मी, दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. तर साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर हे प्रमुख पाहुणे आहेत.
या संमेलनात एकूण सात सत्रे असतील. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. या सत्रात प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत, सत्कार, ग्रंथपुजनाने उद्घाटन, उद्घाटनपर भाषणे आणि अध्यक्षीय मनोगत होणार आहे. दुपारी ११:३० वाजता 'मालवणी मुलखातील लोकसाहित्य' या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाचे प्रा. डॉ. गोविंद काजरेकर हे अध्यक्ष असून यामध्ये उषा परब, अजय कांडर, जी. ए. सावंत व सदाशिव गावकर यांचा सहभाग आहे. तसेच दुपारी १२:३० वाजता वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित व भाऊसाहेब गोसावी यांचा कथाकथन कार्यक्रम होणार आहे.
चौथ्या सत्रात दुपारी २:१५ वाजता मुलाखतकार प्रा. डॉ.बाळकृष्ण लळीत व पत्रकार रजनीश राणे हे दशावतारातील भीष्माचार्य श्री. यशवंत (काका) तेंडोलकर यांची मुलाखत घेणार आहेत. त्यानंतर 'काव्यरंग : मालवणी कवितांचा नाट्याविष्कार' कार्यक्रमात डॉ. सई लळीत या निवेदन करणार असून सिने अभिनेते अभय खडपकर - लास्टो पावस, निलेश पवार - चालता हो, सहकलाकार - सिद्धी वरवडेकर यांचा सहभाग असणार आहे.
सहाव्या सत्रात संध्या तांबे, रुजारिओ पिंटो, डॉ. सई लळीत, विठ्ठल कदम, सरिता पवार, निलेश गावकर, कल्पना मलये यांचे कविसंमेलन होणार आहे. तर सातव्या सत्रात खुले कविसंमेलन होणार आहे.
या संमेलनासाठी सकाळी ९ वाजता प्रतिनिधींनी नोंदणी करायची असून संमेलनस्थळी सकाळी अल्पोपहार, दुपारी भोजन व सायंकाळी चहापान दिले जाणार आहे. तरी या साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमींनी कुटुंबिय व मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक सतीश लळीत आणि डॉ. सई लळीत यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'एमआयडिसी' मधील सर्व उद्योजकांना पोलिस प्रशासनाचे कामगारांची अद्यावय माहिती पोलिस ठाण्यात पुरविण्याचे आवाहन.
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' करायचा सांस्कृतिक जागृतीपर इशारा दिलेला होता...!
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या