ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने १९ जुलै रोजी विद्यार्थ्यांचा सन्मान, शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ व पालक विद्यार्थी मेळावा.

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने १९ जुलै रोजी विद्यार्थ्यांचा सन्मान, शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ व पालक विद्यार्थी मेळावा.

प्रकाशन: 17 Jul 2025 05:27 PM
वाचन संख्या 373

मालवण | ब्यूरो न्यूज : बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ होत आहे. शनिवार, १९ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ ते ४:३० या वेळेत दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात इयत्ता सातवी शिष्यवृत्तीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शिष्यवृत्ती वर्गाचा औपचारिक शुभारंभ केला जाणार आहे. यानंतर सायंकाळी ४.३० वाजता १०वी, ७वी NMMS व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार आणि पालक व विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती सातत्याने वृद्धिंगत करण्यासाठी व मार्गदर्शन घेण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवांगणच्या वतीने अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष श्री. शैलेश खांडाळेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीच्या प्रवासात विद्यार्थ्यांना बळ देणारा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा देणारा हा उपक्रम, मालवणच्या शैक्षणिक वातावरणात नवी ऊर्जा निर्माण करेल, असा विश्वास सेवांगणच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स