ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच आरक्षण सोडत निश्चित.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच आरक्षण सोडत निश्चित.

प्रकाशन: 15 Jul 2025 07:37 PM
वाचन संख्या 78

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यात २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली. तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

रघुनाथ देसाई सभागृह मालवण येथे तहसीलदार वर्षा झालटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शालेय विद्यार्थिनी ऐश्वर्या तोंडवळकर हिच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार प्रिया हर्णे-परब, सहाय्यक महसूल अधिकारी एम. जी. गवस, मंडळ अधिकारी पी. डी. लोबो, संतोष गुरखे, डी. व्ही. शिंगारे, महसूल सहाय्यक आनंद तोंडवळकर, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, ग्राम महसूल अधिकारी कोतवाल तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आरक्षण बाबत उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना व शंकांना तहसीलदार वर्षा झालटे यांनी शासन निर्णय, तरतुदी व नियमानुसार परिपूर्ण माहिती दिली.

ग्रामपंचायत सरपंच आरक्षण

अनुसूचित जाती महिला आरक्षित गोळवण, राठीवडे तर अनुसूचित जाती तळगाव, बांदिवडे बुद्रुक, त्रिंबक

अनुसूचित जमाती महिला आरक्षित वराड

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित

वायंगवडे, मसदे-चुनवरे, वेरळ, पेंडूर-खरारे, तिरवडे, कोळंब, वायरी-भुतनाथ, पोईप, नांदरुख

नागरिकांचा मागास प्रवर्ग

आंबडोस, बांदिवडे खुर्द कोईळ, देवबाग, काळसे, खोटले, मिर्याबांदा-सर्जेकोट, गोठणे, हेदूळ, चौके

सर्वसाधारण (खुला) महिला आरक्षित

वडाचापाट, मर्डे, बुधवळे-कुडोपी, असगणी, आंबेरी, हिवाळे, रेवंडी, ओवळीये, देवली, मालोंड, रामगड, असरोंडी, धामापूर, श्रावण, कुंभारमाठ, कांदळगाव, कातवड, निरोम, कुणकावळे, सुकळवाड

सर्वसाधारण (खुले)

तोंडवळी, बीळवस, हडी, महान, शिरवंडे, साळेल, आनंदव्हाळ, कार्लाचाव्हाळ, चाफेखोल, मठबुद्रुक, किर्लोस, वरची गुरामवाड, चिंदर, माळगाव, आडवली-मालडी, देऊळवाडा, पळसंब, तारकर्ली-काळेथर, आचरा, घुमडे, वायंगणी, अशाप्रकारे सरपंच आरक्षण निश्चित झाले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स