रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षपदी पंकज पेडणेकर, सचिवपदी रंजन तांबे व खजिनदारपदी चंद्रशेखर पेंडूरकर यांची निवड.
१२ जुलै रोजी पदग्रहण सोहळा.
मालवण | ब्यूरो न्यूज : रोटरी च्या २०२५-२६ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून च्या अध्यक्षपदी पंकज पेडणेकर यांची तर सचिवपदी रंजन तांबे व खजिनदारपदी चंद्रशेखर पेंडूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नवीन सदस्य ओळख उपक्रमाचे जिल्हा अध्यक्ष सुभाष साजणे यांच्या हस्ते व चे असिस्टंट गव्हर्नर डॉ. प्रशांत कोलते यांच्या उपस्थितीत १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मालवण कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे होणार आहे.
रोटरी मालवणची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : प्रेसिडेंट – पंकज पेडणेकर, व्हाईस प्रेसिडेंट – ॲड. हेमेंद्र गोवेकर, सेक्रेटरी – रंजन तांबे, जॉईंट सेक्रेटरी- विठ्ठल साळगांवकर, ट्रेझरर- चंद्रशेखर पेंडूरकर, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट – रमाकांत वाक्कर, सर्व्हिस – डॉ. लीना लिमये, कम्युनिटी सर्व्हिस – सुहास ओरसकर, व्होकेशनल सर्व्हिस – महादेव पाटकर, इंटरनॅशनल सर्व्हिस – डॉ. अच्युत सोमवंशी, युथ सर्व्हिस – डॉ. चेतन म्हाडगुत, रोटरी फाऊंडेशन- प्रदीप जोशी, मेंबरशिप डेव्हलपमेंट- श्रीकृष्ण तारी, ॲडमिन – डॉ. अजित लिमये, बुलेटिन – निलम जोशी, सार्जंट ॲऑट आर्मुस- प्रदिप सामंत, स्पोर्टस चेअरमन ऋषीकेश पेणकर, ट्रेनर – उमेश सांगोडकर, लिटरसी प्रमोशन – सुविधा तिनईकर, फेलोशिप- डॉ. उल्हास मसुरकर.
या पदग्रहण सोहळ्यासाठी रोटरी मालवणचे सदस्य तसेच जिल्ह्यातील सर्व रोटरी चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)