कर्ली नदीपात्रात उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला.
पोलिसांची माहिती.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : दोन दिवसांपूर्वी नेरूरपार पुलावरून कर्ली नदीपात्रात उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह बुधवार, ०२ जुलै रोजी सकाळी त्याच नदीपात्रात आढळला. नेरूर चव्हाटा वसूसेवाडी येथील विनायक उर्फ सागर मारुती नारिंग्रेकर (३५) असे तरुणाचे नाव आहे. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली आहे.
सोमवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी तरुणाने नेरुरपार पुलावरून कर्ली नदीत उडी घेतल्याचे तेथून जाणाऱ्या एका रिक्षा व्यावसायिकाने पाहिले होते. मात्र, त्या पात्रात व आजूबाजूला शोध घेतला असता तो बेपता तरुण सापडला नव्हता. दरम्यान, नेरूर चव्हाटा वसूसेवाडी येथील विनायक उर्फ सागर नारिंग्रेकर सोमवारी सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून निघून गेला होता. तो त्या दिवशी सायंकाळी तसेच मंगळवारी सायंकाळपर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे कुडाळ पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. ग्रामस्थ त्याचा शोध घेत असताना बुधवारी सकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह कर्ली नदी पात्रात आढळला.
यावेळी कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढला. त्याचा मृतदेह आज सकाळी त्याच नदीपात्रात आढळला, माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे नेरूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)