ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवण रेवतळे येथे ३ जुलैपासून पावसाळी रबर बाॅल क्रिकेट स्पर्धा.

मालवण रेवतळे येथे ३ जुलैपासून पावसाळी रबर बाॅल क्रिकेट स्पर्धा.

प्रकाशन: 02 Jul 2025 03:20 PM
वाचन संख्या 388

मालवण | ब्यूरो न्यूज : रुपेश करलकर आणि उमेश चव्हाण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक गाव एक संघ’ पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला ३ जुलै पासून, महापुरुष रेवतळे येथील मैदानावर खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा ६ जुलैपर्यंत चालेल.

या स्पर्धेतील विजेत्या संघाला २५,०००/- रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला १५,०००/- रुपये व आकर्षक चषकदेऊन गौरवण्यात येईल. वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. यामध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाईल.

स्पर्धेतील सामने ‘SKY NEWS TODAY’ या युट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे.

या स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा प्रवेशिकेसाठी इच्छुकांनी पायस अल्मेडा (९३०७९१५१४१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सौजन्य : मालवण ब्यूरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स