बांदिवडे येथे विद्यार्थ्यांना छत्री वाटप कार्यक्रम.
मसुरे | प्रतिनिधी : बांदिवडे बुद्रुक गावातील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. लखमेश्वर नामसप्ताह मंडळ बांदिवडे यांच्या वतीने बांदिवडे केंद्रशाळा नं. १, पालयेवाडी, मळावाडी शाळा यामधील सर्व विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. मधुकर परब, उपाध्यक्ष श्री. हिरेश मुणगेकर, सचिव श्री. विश्वनाथ परब, खजिनदार के. के. सांवत, उपसचिव शाहुलखन बांदिवडेकर, श्री. महेश हडकर आदी उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी मंडळाच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)