ताज्या बातम्या
मालवण नगरपरिषदेतर्फे जलसंधारण दिन उत्साहात साजरा. कट्टा येथे हिरकणी प्रभाग संघ सुकळवाडची वार्षिक सभा संपन्न. मालवण नगरपरिषदेची मोकाट गुरांविरोधात कारवाई सुरू. मालवणातील दिव्यांग बांधवांना नगरपरिषदेत ४ सप्टेंबर पर्यंत 'हयातीचे प्रमाणपत्र' सादर करायचे आवाहन. सावंतवाडीत 'प्राचार्य विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन' स्पर्धेचे ३० ऑगस्टला आयोजन. ज्येष्ठ समाजसेविका वंदना करंबेळकर यांना 'कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक' पुरस्कार जाहीर. आचरा तिठा येथे २५ ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत नारळ लढवणे स्पर्धा. वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती दिन राष्ट्र समर्पित क्रांतिकारकांच्या कृतज्ञतेत साजरा. मुंबई विद्यापीठ कथाकथन स्पर्धा प्रकारात कट्टा महाविद्यालयाच्या प्राची परब यांची अंतिम फेरीसाठी निवड. पोलिस हवालदार अर्चना म्हात्रे यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान.
एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडीच्या गुणवंत खेळाडूंचा वार्षिक सत्कार सोहळा संपन्न.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडीच्या गुणवंत खेळाडूंचा वार्षिक सत्कार सोहळा संपन्न.

एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडीच्या गुणवंत खेळाडूंचा वार्षिक सत्कार सोहळा संपन्न.

Article image

क्रीडा विशेष | सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात एम क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडू मुलांचा वार्षिक सत्कार सोहळा १५ ऑगस्ट २०२६ रोजी खासकिल वाड्यातल्या मांगिरीष बँक्वेट हॉलमध्ये संपन्न झाला. सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षा युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते हा विशेष सत्कार सोहळा संपन्न झाला. 


यावेळी नगरसेविका नीलम परिमल नाईक, ॲकॅडमीचे अध्यक्ष उदय नाईक यांच्यासह उपाध्यक्ष एडवोकेट परिमल नाईक, ॲकॅडमीचे सदस्य प्रसाद सावंत, श्रीकांत दळवी, साधना रेगे, जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हळदिवे, रत्नागिरी येथील सोसा मैदानाचे मालक उद्योजक केतन सावंत, ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक राहुल रेगे, सहाय्यक प्रशिक्षक नागेश रेगे यांची सोहळ्याला उपस्थिती होती.  


सूत्रसंचालक गुरु चिटणीस यांनी उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविका दरम्यान त्यांनी एम क्रिकेट ॲकॅडॅमीच्या गेल्या १२ वर्षांतील खेळाडू घडविणे आणि इतर घटकांचा आढावा घेतला. बारावे वर्ष हे ॲकॅडमीसाठी 'गोल्डन ईअर तथा सोनेरी वर्ष' ठरले असे त्यांनी आवर्जून नमूद केले. यावर्षी या ॲकॅडमीने स्टेट व नॅशनल खेळाडू घडवून बारा वर्षाच्या क्रिकेट प्रशिक्षण तपाच्या इतिहासाची झळाळी वाढवली असेही त्यांनी ॲकॅडॅमीच्या वतीने सांगितले. यंदा, आर्यन दुधवडकर, दत्तेय नाईक, सुमित परब, साहिल मैत्री, सोनिक पडते, मयूर देसाई या खेळाडूंनी राज्यस्तरावर महाराष्ट्राकडून व गोव्याकडून सहभाग नोंदवला. १६ वर्षांखालील भगवान पांढरे याने महाराष्ट्र राज्याकडून, १४ वर्षाखालील नंथन सावंत, निहाल पेडणेकर आणि पंधरा वर्षाखालील मुलींमध्ये आर्या परब, निर्मिती खानविलकर तर २३ वर्षाखालील मुलींमध्ये उर्वशी गोवेकर यांचा गोव्याकडून संघामध्ये समावेश राहिला अशी त्यांनी माहिती दिली. 


या सोहळ्यात, गेल्या चार वर्षाप्रमाणे यंदा देखिल सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या समाजोपयोगी व्यक्तींचा समारंभात करण्यात आला केला. यावर्षी बांदा रोणापाल येथील दयासागर छात्रालयाद्वारे शेकडो गरजू व वंचित मुला मुलींच्या जीवनाला योग्य आकार देण्यासाठी कार्य करत असलेल्या जीवबा भरत वीर यांचा सन्मान करण्यात आला. त्या शास्त्रालयात ४० पेक्षा अधिक गरजू मुलां मुलींचा समावेश आहे. जिवबा वीर यांचा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते शाल - श्रीफळ - सन्मानचिन्ह व आर्थिक मदत अशा स्वरुपात गौरवण्यात आले.   



कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी एम ॲकॅडमीच्या कामाची प्रशंसा केली. एम क्रिकेट ॲकॅडॅमीच्या खेळाडू घडवणे ह्या संकल्पनेतून जास्तीत जास्त खेळाडू या ॲकॅडमी कडून राज्याचे व देशाचे प्रतिनिधित्व करताना भविष्यात दिसतील अशा विशेष शुभेच्छा त्यांनी मनोगताद्वारे दिल्या. 


हौशी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनिल हळदिवे यांनी त्यांच्या मनोगतात हौशी संघटनेतर्फे तर्फे घेण्यात आलेल्या सोळा वर्षाखालील मागील वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेविषयी एम क्रिकेट अकॅडमीचा संघ त्या स्पर्धेत विजयी झाला होता याचे स्मरण करुन प्रशंसा केली तसेच यंदा देखिल हौशी संघटनेतर्फे घेणार येणाऱ्या स्पर्धेमध्ये व शिबिरामध्ये सर्व खेळाडू मुलांनी यशस्वीपणे सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 


रत्नागिरी येथील सोसा क्रिकेट ग्राउंड चे मालक उद्योजक केतन सावंत यांनी पण एम क्रिकेट अकॅडमी घडवत असलेल्या खेळाडूंबद्दल आणि विविध सामाजीक उपक्रमांबद्दल गौरवौद्गार काढले व शुभेच्छा दिल्या. 


खेळाडूंच्या वतीने मनोगतात निहाल पेडणेकर या खेळाडूने प्रशिक्षक व एम अकॅडमीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पालकांच्या वतीने श्री. पेडणेकर श्री. निलेश राऊळ, श्री. गाडेकर व श्री. दत्तगुरु सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना या अकॅडमी प्रवेश घेतल्यापासून खेळाडू घडवण्याच्या अकॅडमीच्या प्रोसेसवरचा पालकांचा असलेला विश्वास व्यक्त केला. 


एम क्रिकेटॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्री. राहुल रेगे यांनी प्रशिक्षकाच्या मनोगतात खेळाडूंना फिटनेसवर भर देण्याचे मार्गदर्शनपर आवाहन केले. प्रशिक्षक राहुल रेगे म्हणाले की खेळाडूने प्रथम ऍथलीट बनणं गरजेचं आहे. त्यासाठी सुनियोजित फिटनेस व डाएट प्लॅन, सरावाचे योग्य नियोजन आणि त्याचे एकत्रित वेळापत्रक बनवले तरच भविष्यात खेळाडू यशस्वी बनू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी जे खेळाडू नॅशनलला व राज्यस्तरीय खेळले त्यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि ह्या सर्व खेळाडूंचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार काढले. त्यांनी २०२५ २०२६ मध्ये खेळल्या गेलेल्या विविध गटातील स्पर्धांबाबत माहिती दिली तसेच यंदाच्या २०२६ ते २०२७ मध्ये होणाऱ्या विविध गटातील स्पर्धांबाबत खेळाडू व त्यांच्या पालकांना कल्पना दिली

  


यावेळी विविध कॅटेगिरी प्रमाणे मुलांचा सत्कार करण्यात आले. प्रत्येक खेळाडूचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये ३० इमर्जिंग खेळाडूंचा सर्टिफिकेट व मेडल देऊन गौरव करण्यात आला.  


त्या उदयोन्मुख तथा इमर्जिंग खेळाडुंची नावे पुढील प्रमाणे आहेत. दर्श राणा, आरुष नाईक, शुभंकर वंजारी, जीवन सुतार, वेदांत परब, अथर्व परब, श्रीराज जट्टे वाडकर, पूर्वांग परब, वेद गावडे, सुहान शेख, आराध्य नाईक, कृष्णा चौधरी, पार्थ सावंत, भावेश केसरकर, युवराज राऊळ, आयुष बामणे, तेजन परब, गौरांग बांदोडेकर, तनिष सावंत, आयुष गवस, यश जाधव, तनिष निर्मळे, अथर्व सावंत. मुलींमध्ये स्वरा साखरकर, ओवी जट्टे वाडकर.  


यावर्षी १२ वर्षाखालील चमकदार कामगिरी केलेले राधेश नाईक, दैविक वायंगणकर, विश्वराज नाईक, सहस वैजी, रजी बुरान, हार्दिक सावंत तसेच १४ वर्षाखालील शयान बेग, नंथन सावंत, सोनिक पडते, श्रेयश कांबळे, आयुष निर्गुण, तन्मय कळसकर, निहाल पेडणेकर, यश भिसे तर यष्टीरक्षक म्हणून सोनिक पडते आणि १६ वर्षाखालील सुमेध परब, साहिल मैत्री, मयंक राऊळ, संकेत राणे, सुहान बांदेकर, पियुष सावंत, आयुष गोवेकर तर यष्टीरक्षक म्हणून सार्थक तळावणेकर तसेच १९ वर्षाखालील आदित्य इंगळे, आर्यन दूधवडकर, दत्तेय नाईक, वेद मुळीक, रितिक बुरुड तसेच मुलीमध्ये १५ वर्षाखालील आर्या परब व निर्मिती खानविलकर आणि १९ वर्षाखालील श्रुती गाडेकर तर २३ वर्षाखालील उर्वशी गोवेकर यांना सर्व खेळाडूंना सर्टिफिकेट व ट्रॉफी देण्यात आली. यावर्षीपासून विशेष सत्कार विशेष कॅटेगिरी मध्ये करण्यात आला. 


यामध्ये या वर्षातील सर्वश्रेष्ठांमध्ये सर्वश्रेष्ठ इनिंग ' सुमेध परब, उत्कृष्ट गोलंदाजी स्पेल - मयांक राऊळ, उत्कृष्ट झेल विश्वनाथ रेगे, बेस्ट ऍथलेट - प्रिन्स प्रसाद, हॅंडीकॅप प्लेअर ' - शार्दुल राणे, हार्ड वर्किंग प्लेअर - विहान गावकर, अंजली साखळकर व तनिश बेहरे तर यावर्षीचा बेस्ट कॅप्टन शयान बेग आणि अकॅडमी प्लेयर म्हणून मानाचा वार्षिक पुरस्कार यावर्षी साहिल नाटलेकरला मिळाला. तसेच यावर्षी निवड झालेले नॅशनल स्पर्धेत व राज्यस्तरीय स्पर्धेतील खेळाडू खेळाडूंचा विशेष सत्कार अकॅडमी सर्टिफिकेट देऊन करण्यात आला.  तसेच ॲकॅडॅमीच्या वतीने दिला जाणारा वार्षिक 'जाॅन्टी र्‍होड्स' पुरस्कार साहील नाटलेकर याने प्राप्त केला.

 

सहाय्यक प्रशिक्षक नागेश रेगे यांनी आभार प्रदर्शनाद्वारे

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर तसेच मांगिरीष बॅन्क्वेट हाॅल व्यवस्थापन आणि एम क्रिकेट ॲकॅडॅमीशी संबंधित सर्व हितचिंतक, पालक आणि सहकारी वर्गाचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स