कोकण रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर.
ब्यूरो न्यूज : श्री. सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. श्री. नारकर हे १९९७ पासून कोकण रेल्वे मध्ये कार्यरत आहेत. कोकण रेल्वे मधील त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे भूषवली आहेत.
रत्नागिरी येथे प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (आरटीएम) आणि मडगाव येथे वरिष्ठ प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (सीनियर आरटीएम) या पदांच्या जबाबदाऱ्या यापूर्वी त्यांच्याकडे होत्या. बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक (उपाध्यक्ष सीसीएम) पदाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे तसेच
व्यावसायिक आणि जनसंपर्क क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे अशी माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)