ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ  लेदरबाॅल क्रिकेटपटूंच्या महाविद्यालयाला अनोख्या पद्धतीने सदिच्छा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटूंच्या महाविद्यालयाला अनोख्या पद्धतीने सदिच्छा.

प्रकाशन: 27 Apr 2025 03:18 PM
वाचन संख्या 113

सिंधुदुर्ग महाविद्यालय हिरक महोत्सव समारोपाचे औचित्य.

मालवण : मालवण शहरातील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय हीरक महोत्सव समारोप समारंभ २६ एप्रिल रोजी संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर, बोर्डिंग ग्राऊंड येथे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील माजी विद्यार्थी तथा महाविद्यालयाचे लेदरबाॅल क्रिकेटपटू एकत्र आले आणि त्यांनी लेदरबाॅल क्रिकेट खेळून महाविद्यालयाला अनोख्या पद्धतीने सदिच्छा दिल्या. लेदरबाॅल क्रिकेटपटू व स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. नंदू देसाई यांची संकल्पना असलेल्या या उपक्रमाला अनेक माजी विद्यार्थी तथा लेदरबाॅल क्रिकेटपटूंनी उत्साहात सहभाग घेतला. यावेळी, महाविद्यालयात १९८३-१९८४ च्या वर्षी विभागीय स्तरावरील अंतिम फेरीत पोचत इतिहास रचलेल्या संघातील खेळाडूंची विशेष उपस्थित होती.

यावेळी लेदरबाॅल क्रिकेटसाठी प्रतिकूल वातावरण असूनही यशस्वी ठरलेल्या माजी विद्यार्थी लेदरबाॅल क्रिकेट खेळाडूंनी त्यांनी बोर्डिंग ग्राऊंड मैदानावर घेतलेली मेहनत व त्यांना मार्गदर्शन केलेल्या सर्वांची विशेष आठवण काढली. आता महाविद्यालयातील क्रिकेटपटूंसाठी व क्रिकेटच्या विकासासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. टर्फ खेळपट्टी, जाळ्यांतील सराव, पॅवेलियन या व अशा घटकांमुळे क्रिकेट विकासासाठी खूप मोठी संधी निर्माण झाली असून या घटकाचा प्रामाणिकपणे व विनम्रपणे लाभ घ्यावा असे माजी विद्यार्थी तथा लेदरबाॅल क्रिकेटपटूंनी आवाहन केले.

यावेळी या उपक्रमाचे संकल्पक नंदू देसाई यांच्यासह पप्पू परब, महेश कांदळगांवकर, विक्रम मोरे, जयंत गवंडी, शेखर आचरेकर, शेखर पाटकर, शंकर पराडकर, चिका फर्नांडिस, जितू वाळके, जयंत गवंडे, फ्रान्सिस डिसोझा, बाबा परब, दीपक धुरी, झहीर शेख़, विनायक पराडकर, महेन ढोलम, मंदार केणी, यतीन खोत, नीलकंठ मालणकर, चिन्मय पाटकर, भूषण म्हापणकर, परशुराम पाटकर, सिद्धार्थ जाधव, बंड्या वायंगणकर, क्रिकेट प्रशिक्षक आशिष परुळेकर, स. का. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, मालवणचे नागरीक उपस्थित होते.

अनेक वर्षांनंतर एकत्र येत पारंपरिक क्रिकेटच्या शिस्तीत, खेळाडूंनी रणरणत्या उन्हामध्ये दिवसभर लेदरबाॅल क्रिकेट खेळून महाविद्यालयाला सदिच्छा देणे प्रशंसेचे ठरले अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स