ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
रेकोबा विद्यालयाच्या गौरांग मालंडकरची महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट संघात निवड.

रेकोबा विद्यालयाच्या गौरांग मालंडकरची महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट संघात निवड.

रेकोबा विद्यालयाच्या गौरांग मालंडकरची महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट संघात निवड.

Article image


मालवण | प्रतिनिधी : मालवण - वायरी येथील रेकोबा विद्यालयातील इयत्ता नववीत शिकणाऱ्या गौरांग रामचंद्र मालंडकर याची महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षांखालील टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे. उत्तर प्रदेश येथे दि. १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड चाचणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे घेण्यात आली.


टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या निवड चाचणीत राज्यातील विविध खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या चाचणीत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गौरांग मालंडकर याने महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील राज्य संघात स्थान मिळविले.


गौरांग हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने आपल्या खेळातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर ही निवड निश्चित केली. त्याला रेकोबा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. फणसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. गौरांगच्या या यशाबद्दल रेकोबा विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खोचरे, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल लंगोटे याची वेटलिफ्टिंग मध्ये विभाग स्तरावर निवड.

लोकप्रिय टॅग्स