ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
दिनेश व्यास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याचा उचित लाभ करत या शिबिरात क्रिकेटचा आनंद घ्या…!

दिनेश व्यास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याचा उचित लाभ करत या शिबिरात क्रिकेटचा आनंद घ्या…!

प्रकाशन: 09 May 2025 12:52 PM
वाचन संख्या 104

माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांचा उन्हाळी
लेदरबाॅल क्रिकेट प्रशिक्षण शिबीरात सहभागी मुलांशी मार्गदर्शनपर संवाद.

मालवण तालुका क्रिकेट असोशिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रम.

मालवण | प्रतिनिधी : दिनेश व्यास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याचा उचित लाभ करुन घेत क्रिकेटचा आनंद घ्यावा, असे मार्गदर्शनपर आवाहन ज्येष्ठ कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी मालवण येथे केले. भारताचे माजी कसोटीपटू व तंत्रशुध्द फलंदाज श्री संजय मांजरेकर यांनी, मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंड येथे सुरू असलेल्या लेदरबाॅल क्रिकेटच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबीरातील सहभागी प्रशिक्षणार्थी मुलांशी, ८ मे रोजी विशेष संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

हे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर दिनेश व्यास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने व संजय विजय मांजरेकर यांच्या सहकार्याने मालवण तालुका क्रिकेट असोशिएशनच्या वतीने, २७ एप्रिल २०२५ ते ११ मे २०२५ असे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी संजय मांजरेकर, एन. सी. ए. प्रमाणित प्रशिक्षक श्री. आशिष परुळेकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात सुरवातीला मालवण तालुका क्रिकेट असोशिएशन आणि मालवण स्पोर्टस् क्लबच्या वतीने श्री. संजय विजय मांजरेकर व आशिष परुळेकर यांचे मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी संवाद साधताना संजय मांजरेकर यांनी प्रथम दिनेश व्यास पब्लिक चॅरिटेबल यांनी या क्रिकेट प्रशिक्षण शिबीरास प्रायोजित केल्याबद्दल आभार मानले. तसेच ते म्हणाले की, आपल्या काळी खेळताना वेगळी आव्हाने होती व आज मुलांना वेगळी आव्हाने आहेत. आपल्याला आनंद मिळतो अशा क्षेत्रात नियमीत काम करत रहाणं हे गरजेचे आहे. प्रशिक्षक, पालक व ज्येष्ठ खेळाडू यांनी मुलांना, क्रिकेटच्या नेमक्या कोणत्या प्रकारात रस आहे हे जाणून त्याप्रमाणे त्यांना तयार करावे. तिन्ही फाॅर्मॅटचे वैशिष्ट्य वेगळे आहे. कसोटी क्रिकेट हे शास्त्रीय संगितासारखे आहे व ते तसे जपले पाहिजे व टी ट्वेंटी क्रिकेट सारख्या अर्थार्जन वाढवू शकणारं साधन सुद्धा आपल्याला अवगत पाहिजे. यावेळी त्यांनी महिला क्रिकेटला सुद्धा प्रचंड संधी असल्याचे सांगितले. संजय मांजरेकर यांनी, या शिबिरात प्रशिक्षण घेणार्या गार्गी जुवेकर हिचे विशेष अभिनंदन केले व पुढील शिबिरात आणखीन मुली सहभागी झालेल्या पहायला मिळतील अशी आशा व्यक्त केली.

यावेळी माजी लेदरबाॅल क्रिकेट खेळाडू व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबा परब, नंदू देसाई यांनी, श्री संजय मांजरेकर यांच्या कारकिर्दीबद्दल त्यांचे विशेष मनोगत व्यक्त केले व मालवण क्रिकेट परंपरेविषयी थोडक्यात समजावून सांगितले. त्यांनी, उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील सहभागी मुलांना जुन्या काळातील प्रतिकूलतांवर मात करुन आता मालवणमध्ये उपलब्ध असलेल्या लेदरबाॅल क्रिकेटच्या सोयींचा शिस्तबद्ध पद्धतीने लाभ घ्यावा असे सांगत सदिच्छा दिल्या.

यावेळी जयंत गवंडे, बबन रेडकर, विलास परुळेकर, अजित मोरे, आप्पा मालंडकर, पप्पू परब, दीपक धुरी,परशुराम पाटकर, जाॅन नरोन्हा, नीळकंठ मालणकर, जितू वाळके, अण्णा कारेकर, अमित कारेकर, नरी चिंदरकर, पडेलकर, शंकर पराडकर, तमास आल्मेडा, रेनाॅल्ड भुतेलो, संजय कासवकर, मालवण तालुका क्रिकेट असोशिएशन व मालवण स्पोर्टस् क्लब पदाधिकारी व सदस्य, मालवणचे आजी माजी क्रिकेटपटू, क्रिकेट चाहते, प्रशिक्षणार्थी मुले व त्यांचे पालक उपस्थित होते.

मालवण तालुका क्रिकेट असोशिएशनच्या वतीने दिनेश व्यास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व संजय मांजरेकर आणि प्रशिक्षक आशिष परुळेकर यांची प्रशिक्षण शिबीरासाठी सहकार्य केल्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

मालवण तालुका क्रिकेट असोशिएशनच्या वतीने, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स