ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
स्पीड फाऊंडेशनच्या माध्यमातून क्रिकेट प्रशिक्षक अशोक आस्वलकर यांची क्रिकेट प्रशिक्षण ॲकॅडमींना भेट.

स्पीड फाऊंडेशनच्या माध्यमातून क्रिकेट प्रशिक्षक अशोक आस्वलकर यांची क्रिकेट प्रशिक्षण ॲकॅडमींना भेट.

प्रकाशन: 28 May 2025 05:08 PM
वाचन संख्या 156

स्पीड फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष डाॅ. शिरीष कदम यांच्या मार्गदर्शनाखालील उपक्रमाला पदाधिकारी सुहास उर्फ पप्पू कदम व मान्यवर आणि प्रशिक्षकांची उपस्थिती.

सिंधुदुर्ग : स्पीड फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष डाॅ. शिरीष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व स्पीड फाऊंडेशनच्या माध्यमातून, स्पीड फाऊंडेशनचे प्रमुख प्रशिक्षक तथा भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांचे प्रशिक्षक श्री. अशोक आस्वलकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट प्रशिक्षण ॲकॅडमींना भेट दिली. २२ मे पासून सुरू झालेल्या या उपक्रमात सावंतवाडी तालुक्यातल्या इन्सुली आणि देवगड तालुक्यातल्या शिरगांव व देवगड येथील क्रिकेट प्रशिक्षण ॲकॅडमींना त्यांनी भेट देत तिथल्या मुलांशी, प्रशिक्षकांशी व पालकांशी संवाद साधला. यावेळी स्पीड फाऊंडेशनचे संस्थापक पदाधिकारी सुहास उर्फ पप्पू कदम, सौ. मनिषा आस्वलकर व मान्यवर उपस्थित होते.

डाॅ. शिरीष कदम ( संस्थापक अध्यक्ष, स्पीड फाऊंडेशन. )

२२ मे रोजी इन्सुली व २४ मे रोजी शिरगांव येथे संपन्न झालेल्या या उपक्रमांना इन्सुलीचे प्रशिक्षक भारत गरुडकर, शिरगांव क्रिकेट ॲकॅडमी प्रशिक्षक सुधीर साटम तर देवगड क्रिकेट ॲकॅडमीचे प्रशिक्षक उदय रुमडे यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रशिक्षक अशोक आस्वलकर यांनी मुलांसोबत जाळ्यांतील सराव, क्षेत्ररक्षण, पावसाळ्यातील कालावधीत लेदरबाॅल क्रिकेटपटूचा दिनक्रम तसेच मॅच फिटनेस व लेदरबाॅल क्रिकेट याविषयी मुलांना मार्गदर्शन केले. पालकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मुलांना क्रिकेट प्रशिक्षकासोबत विश्वासूपणे सोपवल्यानंतर मुलांवर आणखी दबाव टाकू नये. मुलांकडे सतत चांगल्या कामगिरीची अपेक्षा स्वाभाविक आहे परंतु त्यासाठी मुलांना सतत मैदानावर उपस्थित रहायला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

प्रशिक्षक अशोक आस्वलकर व स्पीड फाऊंडेशन संस्थापक पदाधिकारी सुहास ( पप्पू) कदम

स्पीड फाऊंडेशनच्या माध्यमातून कोकणातील ‘हिडन टॅलेंट’ साठी जास्तीतजास्त सामने उपलब्ध करुन देणे हा स्पीड फाऊंडेशनचा प्रमुख उद्देश आहे असे स्पीड फाऊंडेशनचे संस्थापक पदाधिकारी सुहास उर्फ पप्पू कदम यांनी स्पष्ट केले.

क्रिकेट ॲकॅडमींच्या वतीने स्पीड फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष डाॅ शिरीष कदम, सुहास ( पप्पू) कदम व सहकारी आणि प्रशिक्षक अशोक आस्वलकर यांचे आभार मानण्यात आले. यंदाच्या दिवाळीनंतर स्पीड फाऊंडेशनच्या माध्यमातून कोकणातील क्रिकेट सामन्यांना चालना मिळेल आणि त्यासाठी आजी माजी क्रिकेटपटू, ॲकॅडमीज, पालक यांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काही क्षणचित्रे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स