ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मंत्री नितेश राणे यांची टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही.

मंत्री नितेश राणे यांची टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही.

प्रकाशन: 02 Jul 2025 02:52 PM
वाचन संख्या 198


चालकांचे आंदोलन तूर्तास मागे.


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सेवा देणाऱ्या व बारा तास काम करणाऱ्या टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न त्यांच्या आंदोलनामुळे समोर आले आहेत. अल्प मानधनावर काम करणाऱ्या या रुग्णवाहिका चालकानी वाढीव मानधन व अन्य प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी भवना समोर आंदोलन छेडले. सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या आंदोलनाची तात्काळ दखल घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याशी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. या प्रश्नाबाबत बैठक घेऊन तोडगा काढू. व या चालकांचे प्रश्न सोडवू अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली. त्यानंतर हे उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.


१२ तास कर्तव्य सेवा करून देखील अल्पमानधावर काम करावे लागत असल्याने जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिका चालक संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा दिला होता. दरम्यान आपल्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना दिले.


संघटनेचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी अमित पांचाळ, रुपेश राणे, केतन पारकर, धैर्यशील शिर्के, रामचंद्र निकम, दादा गवस, बुधाजी जाधव, बाळकृष्ण कोरगावकर, साई मेस्त्री, राघो गवस यांच्या सह अन्य संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मंगळवारी सकाळी 108 रुग्णवाहिका चालक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध घोषणा देत धरणे आंदोलनात सुरुवात केली. आजचे आंदोलन हे केवळ सेवा पुरवठादार कंपनीच्या विरोधात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2014 पासून 108 रुग्णवाहिका चालक प्रामाणिकपणे रुग्ण सेवा देत आहे. परंतु सेवा पुरवठा कंपनी कडून अपेक्षित वेतन मिळत नाहीये. या विरोधात कित्येक वेळा आंदोलने झाली. परंतु कंपनीने केवळ आश्वासन दिली आहेत. त्यामुळे कंपनी विरोधात 108 चालकांमध्ये तीव्र संतोष आहेत. रुग्णवाहिकांची अवस्था सुद्धा बिकट आहे.

रुग्णवाहिकेला, यापूर्वी आग लागून रुग्ण व वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. असेही निवेदनात म्हटले आहे.

समान काम, समान वेतन तत्वावर वेतन मिळावे. चालकाची ड्युटी बारा तासावरुन आठ तास करण्यात यावी. सर्व प्रकारचे भत्ते लागू व्हावेत अशा प्रमुख मागण्या आहेत.


मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय होता. परंतु पालकमंत्री नितेश राणे यांनी आमच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तूर्तास हे आंदोलन काही दिवस थांबवत आहोत. मागण्या मान्य न झाल्यास ५ जुलै पासून पुन्हा आंदोलन सुरु असणार असल्याचे संघटना अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स