आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शनाला आमदार दीपक केसरकरांची भेट.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आमदार दीपक केसरकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, श्री. आंगणे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)