शोध व बचाव पथकांना आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे वितरण.
आंबोली व सांगेलीतील बचाव पथकांचा सत्कार.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शोध व बचाव पथकांना अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे कार्य करु शकणार असल्याचे ‘सिंधुरत्न’ योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर म्हणाले.
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आंबोली व सांगेली येथील शोध व बचाव पथकाकरिता साहित्य वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे प्रमुख आर.जे. यादव, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती सामंत तसेच आंबोली व सांगेलीतील स्थानिक बचाव पथकातील सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. सुकटे यांनी या साहित्यामुळे बचाव पथकाला कशा प्रकारे मदत होणार आहे हे सांगितले. आपल्या जिल्ह्यातील स्थानिक बचाव पथकाला आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या साहित्यामुळे आता ते अधिक प्रभावीपणे काम करु शकणार असल्याचेही ते म्हणाले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)