ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कावळेसाद दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला.

कावळेसाद दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला.

प्रकाशन: 28 Jun 2025 01:47 PM
वाचन संख्या 35

सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : आंबोली येथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) याचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही मोहीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यशस्वी झाली. त्याचा मृतदेह दरीत दीडशे फुट खोलवर आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला.

कोल्हापूर येथून आंबोली येथे फिरण्यासाठी आलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या ग्रुपमधील राजेंद्र सनगर हा तरुण शुक्रवार, २७ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कावळेसाद येथील दरीत कोसळला होता. दाट धुके असल्यामुळे त्याचा शोध घेण्यास अपयश आले होते. त्यामुळे काल सायंकाळी ही मोहीम थांबवण्यात आली होती. २८ जून रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली.

यावेळी एनडीआरएफचे पथक, सांगेली व आंबोली रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मोठ्या दोऱ्यांच्या सहाय्याने दरीत झुला सोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला. १५० ते २०० फुटावर हा मृतदेह आढळून आला. डोक्याच्या बाजूने थेट दरीत कोसळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी राजेंद्र सनगर याच्या नातेवाइकांसह मित्रपरिवार आणि पर्यटकांनी गर्दी केली होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स