रचनात्मक लेखन स्पर्धेत क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर प्रथम.
मसुरे | प्रतिनिधी : सिनिअर सिटीझन फाऊंडेशन, पलावा डोंबिवली तर्फे “माझ्या आयुष्यातील सुंदर क्षण” या विषयावर रचनात्मक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मराठी विभागात सिंधुदुर्ग जिल्हाचे ठाणे स्थित अशोक दाभोलकर ह्यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर श्रीमती रश्मी व मृणाली ह्या अनुक्रमे हिंदी व इंग्रजी विभागात प्रथम आल्या.
यावेळी सिनिअर सिटीझन फाऊंडेशन पलावा कमिटीचे अध्यक्ष बिपिन पुरोहित, सचिव कैलास पाठक, खजिनदार शिवराम अय्यर, सेंट्रल कमिटी, ईसी. कमिटी, लेक शोअर ग्रीन व डाऊन टाऊनचे कमिटी मेंबर तसेच कल्याण ग्रामीण विभाग आमदार राजेश मोरे, हनुमान ठोंबरे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)