कुडाळ येथे 'माझा लोकराजा' महोत्सव २०२५ उत्साहात.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची अध्यक्षीय उपस्थिती.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटनेच्यावतीने कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात ‘माझा लोकराजा’ महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते. हा कार्यक्रम जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, पूर्वीच्या काळातील कलाकारांनी अतिशय कठीण परिस्थितीत ही कला जोपासली. नवीन कलाकार या कलेकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांनी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. आता तर महायुतीचे सरकार आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर या जिल्ह्यामध्ये आहेत. संस्कृतिक मंत्री आशिष शेलार या जिल्ह्याचेच सुपुत्र आहेत. त्यामुळे दशावतार कलाकारावर कोणताही अन्याय होणार नाही. तुमचा प्रश्न आमदार निलेश राणे यांनी हाती घेतला आहे. ते काम जबाबदारीने पूर्ण करतील. दशावतारी कलाकारासाठी वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करा. त्यासाठी आमचे आर्थिक सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्राजक्ता बांदेकर, सुरेश धुरी, अविनाश वालावलकर व रवींद्र भांड यांनीही शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ दशावतार कलाकार कै.महादेव लोट ( भडगाव ) व दशावतारातील ज्येष्ठ पखवाज वादक कै.अशोक नेरुरकर ( नेरूर ) यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तसेच दशावतारातील ज्येष्ठ कलाकार सुरेश धुरी ( माणगाव ) , ज्येष्ठ हार्मोनियम वादक प्रकाश आकेरकर ( आवेरे ) व ज्येष्ठ कलाकार पंढरीनाथ सामंत ( आंदूर्ले ) यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, , सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या सत्काराचे स्वरूप होते. दहावी – बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दशावतारी कलाकारांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. सहकार्य करणारे दाते व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर – बांदेकर, कुडाळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र भांड, नगरसेविका चांदणी कांबळी व नगरसेवक विलास कुडाळकर, शिवसेना शिंदे गट जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर, पणदूर हायस्कूलचे शिक्षक अविनाश वालावलकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर, पखवाज अलंकार महेश सावंत, ॲड. पी.डी देसाई, प्रेमानंद देसाई, ॲड. सोनू गवस, सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिक दशावतार कलाकार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर, केरवडे उपसरपंच अर्जुन परब, दिलीप सावंत, दशावतार कलाकार पपू नांदोसकर, दत्तप्रसाद शेणई, सुधीर तांडेल व सिद्धेश कलिंगण, विनायक घाडी, दिनेश शिंदे, स्वरूप वाळके, लाजरी क्रिकेट ग्रुपचे स्वरूप सावंत व दीपक भोगटे, श्री कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे विलास (बाळा) राऊळ, नीलेश कुडाळकर व महेश मडवळ, अक्षय कासले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष चारुदत्त तेंडोलकर यांनी स्वागत, सूत्रसंचालन हरेश नेमळेकर, वाचन संघटनेचे सल्लागार मोरेश्वर सावंत तर आभार विघ्नराजेंद्र कोंडूरकर यांनी मानले. संघटनेचे पदाधिकारी – सदस्य तसेच तालुक्यासह जिल्ह्यातील कलाकार तसेच नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर कुडाळ तालुक्यातील दशावतार कलाकारांनी रक्तपिसासू रक्ताक्षी नाटक सादर केले.
सौजन्य | कुडाळ ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)