पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या बदलीच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सत्कार सदिच्छा.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या आदेशाखाली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची मालवण येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे. या पार्श्वभूमीवर मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशन, स्वराज्य ढोल ताशा पथक, यशराज प्रेरणा गृप ( आचरे) व कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्गच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या कार्यकालातील सहकार्य सेवेबद्दल त्यांची सदिच्छा भेट घेत कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.
यावेळी मातृत्व आधार फाउंडेशन संस्थापक संतोष लुडबे, स्वराज्य ढोल ताशा पथक संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण अध्यक्ष सौ. शिल्पा यतीन खोत, कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे आनंद बांबर्डेकर, श्रमिका लुडबे, दादा वेंगुर्लेकर, मंदार सरजोशी, अमन गोडावणे, स्वप्नील परुळेकर, शांती तोंडवळकर, कल्पिता जोशी, साक्षी मयेकर, गौरी सातार्डेकर, भारती वाईरकर, ओमकार सांडव, प्रथमेश हरचकर, मिथील मोर्वेकर, जगदीश तोडणकर, सत्यवान भगत, श्रीकांत मालवणकर, संजय अंजणकर, नेवळकर, संतोष सकपाळ, लुडबे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)