सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात पोलीस अधिकाऱ्यांची बदली.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात पोलीस अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी बदलीचे आदेश मंगळवार, २४ जून रोजी काढले आहेत.
पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची बांदा पोलीस ठाणे येथून जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्ग, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांची विजयदुर्ग येथून वैभववाडी पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची मालवण येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची कणकवली येथून मालवण पोलीस ठाणे या पोलीस निरीक्षक यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांची कुडाळ येथून बांदा पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवाले यांची सावंतवाडी येथून विजयदुर्ग पोलीस ठाणे तर पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची कणकवली येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली झाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)