ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून युवकाच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया.

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून युवकाच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया.

प्रकाशन: 17 Jun 2025 11:14 AM
वाचन संख्या 49

युवकाने पत्राद्वारे व्यक्त केली कृतज्ञता.

कुडाळ | ब्यूरो न्यूज : मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आमदार निलेश राणे यांनी निखिल मधुसुदन सातार्डेकर या युवकाला शस्त्रक्रियेसाठी निधी मिळवून दिल्याबद्दल निखिल सातार्डेकर याने आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

निखिल मधुसुदन सातार्डेकर हा युवक आर्थिकदृष्ट्या अडचणीत होता. त्याच्या डाव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ही शस्त्रक्रिया होत नव्हती. दरम्यान शिवसेनेचे ओरोस विभागाचे प्रमुख दीपक नारकर व बावचे माजी सरपंच नागेश परब यांनी ही बाब आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून या युवकाला मदत मिळवून दिली. याबद्दल निखिल सातार्डेकर याने आभार पत्राच्याद्वारे आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. या मदतीमुळे माझ्या पायाची शस्त्रक्रिया वेळेवर झाली आणि मी पुन्हा चालू शकलो असे त्याने आभार पत्रात म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स