मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरील उपक्रमाला मातृत्व आधार फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर व सदस्य मान्यवरांची उपस्थिती.
मालवण | प्रतिनिधी : मालवण वायरी येथे मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने, श्री गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर, मालवण नगरपालिकेतील २५ कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, गणेश लुडबे, संदीप लुडबे, शिक्षक संदीप नेवाळकर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, संजय हंजनकर, विजय मेस्त्री, माजी नगरसेवक जयमाला मयेकर, दुर्वा निर्गुणी आदी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणचे सेवानिवृत्त प्राध्यापक आर. एन. काटकर आणि वैभवी नरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दरम्यान, शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शिक्षक संदीप नेवाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने संबोधित करताना संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती असलेले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे अशा कर्तव्याच्या भावना व प्रत्यक्ष कृती यांचे विशेष स्मरण केले. या उपक्रमाबद्दल कंत्राटी सफाई कर्मचारी बांधवांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)