मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत.
मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत.
मळगाव | प्रतिनिधी : मुंबई - सावंतवाडी मार्गावर नव्याने सुरू झालेल्या नियमित रेल्वेसेवेचे सावंतवाडी रोड स्थानकात, आज ९ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. गाडी स्थानकात दाखल होताच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने इंजिनचे पूजन, पुष्पहार अर्पण करून लोको पायलटसचा सत्कार करण्यात आला. प्रवाशांना पेढे वाटून या नव्या रेल्वेसेवेचा आनंद साजरा करण्यात आला.
गाडी क्रमांक १५०८७ काल, ८ सप्टेंबर २०२६ रोजी, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सावंतवाडीकडे रवाना झाली होती. आज दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास गाडी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात दाखल झाली. या गाडीला कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आल्याने मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुविधा उपलब्ध झाली आहे.
यावेळी लोको पायलट शैलेश पालकर व असिस्टंट लोको पायलट प्रवीण पारावे यांचा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वागत सोहळ्यास कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी मिहिर मठकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट, अभिमन्यू लोंढे, नितिन गावडे, तेजस पोयेकर, प्रेरणा पोकळे, चिन्मय कोळे, उदय नाईक यांच्यासह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक व रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)