ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.


Article image


रोझरी इंग्लिश स्कूलचा संघ जिल्हास्तरावर मालवण तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार.


मालवण | प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग द्वारा आयोजित 'मालवण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ - २०२७ मध्ये, मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या १७ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद मिळवत जिल्हास्तरावर धडक मारली आहे. रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या या संघाने, ८ सप्टेंबर २०२६ रोजी अंतिम सामन्यात कट्टा संघावर मात करत हे विजेतेपद प्राप्त केले आहे. या विजेतेपदासह, मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.


रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या संघाने तालुकास्तरीय विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्यासह संपूर्ण शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशालेचे आजी - माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकांनी रोझरी इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


जिल्हास्तरीय स्पर्धेत मालवण तालुक्याचे नेतृत्व करायला सज्ज झालेल्या ह्या रोझरी इंग्लिश स्कूल कबड्डी संघाचे शिक्षक स्वप्निल तांबे तसेच प्रशिक्षक जेरी फर्नांडिस, सक्रीय हितचिंतक जेवी फर्नांडिस तसेच संघाचे मार्गदर्शक - सहकारी यांची देखिल विविध स्तरातून विशेष प्रशंसा करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स