ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक.

मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. 

Article image


भंडारी हायस्कूल द्वितीय तर नामदेव शंकर कावले इंग्लीश मिडीयम स्कूल, आचरा प्रशाला तृतीय स्थानी.


मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२६ मध्ये मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या विद्यार्थी नाट्य संचाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी 

मालवण तालुकास्तरीय नाट्योत्सव रोझरी इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाला. 


नाट्य उत्सवाच्या उद्घाटनाला मालवण तालुका शिक्षण विस्तार अधिकारी संजय माने, रोझरी इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक फादर अँथोनी डिसोजा, मालवण तालुका विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष संदीप अवसरे सर उपस्थित होते.या नाट्यमहोत्सवात, मालवण तालुक्यातील एकूण पाच शाळांचा सादरीकरण सहभाग होता. शिक्षक सुधीर गोसावी व अक्षय सातार्डेकर यांनी स्पर्धेत परीक्षण केले. 


रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्यासह मान्यवरांची स्पर्धेतील यशस्वी नाट्यसंचांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या तसेच सहभागी शाळांच्या नाट्य संचातील विद्यार्थी विद्यार्थिनींची प्रशंसा केली


या स्पर्धत, रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या शिक्षिका मृदुला केणी यांच्याकडून, सदिच्छा व विज्ञान विषय प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र व ट्राॅफीज विशेष पुरस्कृत करण्यात आल्या होत्या. रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी पोषक व पूरक वातावरणात झालेली ही स्पर्धा अत्यंत संस्मरणीय ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स