आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आजपासून.
तीन गाड्यांच्या वेळेत देखिल बदल.
मळगांव | नितिन गावडे : कोकण रेल्वेच्या मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी रोड - मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या नव्या दैनिक एक्सप्रेसचे नियमित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर मध्य रेल्वेने कोचिंग नोटिफिकेशन क्र. 784/2026 जारी केले आहेत.
गाडी क्र. १५०८७ मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी रोड ही मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ पासून, तर गाडी क्र. १५०८८ सावंतवाडी रोड - मुंबई सीएसएमटी ही बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ पासून नियमित धावणार आहे. ही सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार आहे. नवीन एक्सप्रेसला कोकणातील प्रमुख आणि महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत.
या एक्सप्रेसमध्ये एकूण २३ LHB डबे असतील. त्यामध्ये १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, ४ स्लीपर, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ पॅन्ट्री कार, १ जनरेटर कार, १ दिव्यांगजन व लगेज व्हॅन आणि १ पार्सल व्हॅनचा समावेश आहे.
या गाडीचा रेक १२५३३/१२५३४ गोमतीनगर–मुंबई पुष्पक एक्सप्रेससोबत Integrated Rake Link पद्धतीने जोडण्यात येणार आहे.
नवीन गाडीच्या संचालनामुळे ८ सप्टेंबरपासून मुंबई सीएसएमटी येथे येणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
१२१०६ गोंदिया - मुंबई विदर्भ एक्सप्रेस : सकाळी ६.५० ऐवजी ७.०० वाजता आगमन.
१२८६० हावडा–मुंबई गीतांजली एक्सप्रेस : रात्री ९.२० ऐवजी १०.४५ वाजता आगमन.
१२५३३ गोमतीनगर–मुंबई पुष्पक एक्सप्रेस : रात्री १०.४५ ऐवजी ९.२० वाजता आगमन.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)