कथाकार शांताराम पुरस्कारासाठी सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ पुस्तकाची निवड.
कथाकार शांताराम पुरस्कारासाठी सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ पुस्तकाची निवड.
आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार.
सिंधुदुर्ग : मुंबई मराठी साहित्य संघातर्फे दिल्या जाणाऱ्या के. ज. पुरोहित पुरस्कृत कथाकार शांताराम पुरस्कारासाठी लेखक सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. रोख दहा हजार रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संस्थेच्या वर्धापनदिनी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम, मुंबई मराठी साहित्य संघात सायंकाळी ४:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे असे साहित्य शाखेच्या कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ यांनी पत्राद्वारे सचिन मणेरीकर यांना ही माहिती कळवली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील श्री. सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ या पुस्तकाच्या निवडीबद्दल कऱ्हाडे ब्राम्हण परिवार आणि विविध जणांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)