व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा.
व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा.
ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी, नुकतेच विविध संघटना व संस्थांनी पुढाकार घेत बंधारे बांधण्यासाठी सहकार्य करायचे आवाहन केले होते. या आवाहनाला 'सुक्रियात्मक प्रतिसाद' देत व्हाॅइस ऑफ मीडिया, दोडामार्गच्या वतीने आंबडगाव येथे श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला.
या उपक्रमात व्हाइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भूषण सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बुधाजी (आपा) राणे, ज्येष्ठ पत्रकार शिरीष नाईक, प्रमोद गवस, गोविंद शिरसाट, प्रथमेश नाईक, शुभम गवस, नारायण नाईक आदी पत्रकार बांधवांनी सहभाग घेतला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)