ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पावसाळ्यापूर्वी वीज समस्या सोडवण्यासाठी ९ मे रोजी दोडामार्ग तालुक्यात महा मॅरेथॉन बैठकांचे आयोजन.

पावसाळ्यापूर्वी वीज समस्या सोडवण्यासाठी ९ मे रोजी दोडामार्ग तालुक्यात महा मॅरेथॉन बैठकांचे आयोजन.

प्रकाशन: 07 May 2025 11:03 AM
वाचन संख्या 203

| प्रतिनिधी : पावसाळ्यात तालुक्यात वीज समस्या जाणवत असल्या कारणाने ९ मे रोजी तालुक्यात विविध समस्या पावसाळ्यापूर्वी सोडविण्यासाठी महा मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

पावसाळा जवळ आला की तालुक्यातील वीज समस्या ही गंभीर रुप धारण करते. पावसाळ्यात तालुका अनेक दिवस काळोखात राहत आहे‌. गेले कित्येक दिवस पावसाळ्यातील वीज समस्या ही तालुक्याला डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे तालुक्यात महा मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक ९ मे रोजी सकाळी १०:३० वाजता मांगेली-देऊळवाडी श्री सातेरी देवी मंदिर सभागृह, दुपारी १२:३० वाजता शांतादुर्गा मंदिर खोक्रल, दुपारी ३ वाजता झरे-२ ग्रामपंचायत कार्यालय, दुपारी ४ वाजता पिंपळेश्वर हॉल शहर, संध्याकाळी ५ वाजता सासोली ग्रामपंचायत हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर बैठकांना अधिक्षक अभियंता सिंधुदुर्ग श्री. वनमारे, वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील वीज ग्राहकांनी वीज समस्या २ प्रति लेखी स्वरूपात, समस्यांच्या पुराव्यासह सदर ठिकाणचे फोटो किंवा आपण यापूर्वी दिलेले निवेदन आणायचे आहे‌. मोठ्या संख्येने सदर बैठकांना वीज ग्राहकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना , अध्यक्ष व्यापारी संघटना, सरपंच संघटना, सर्व राजकीय पक्ष तालुकाध्यक्ष, नगराध्यक्ष यांनी आवाहन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स