कु. शौर्या भूषण सावंत हिचे गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत सुयश.
कु. शौर्या भूषण सावंत हिचे गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत सुयश.
दोडामार्ग | ब्यूरो न्यूज : गुरूकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापुर आयोजित 'गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा (G.T.S.)' २०२५-२६ मध्ये दोडामार्ग तालुक्यातील कु. शोर्या भूषण सावंत हिने सुयश प्राप्त केले. सरगवे गावच्या सासोली - हेदुस येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थीनी असलेल्या कु. शौर्या भूषण सावंत हिने ह्या परीक्षेत १०० पैकी ७४ गुण (७४%) मिळवत सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर ९ वा क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यस्तरावर १४ वा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थांनी शौर्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
कु. शोर्या हिने तिच्या सुयशाचे श्रेय आई सौ. जान्हवी व वडिल श्री भूषण सावंत यांच्यासह तिच्या प्रशालेच्या मार्गदर्शक गुरूजनांना दिले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)