व्हाॅईस ऑफ मिडिया दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी आपा राणे आणि सचिवपदी प्रतिक राणे यांची नियुक्ती.
व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्गचे अध्यक्ष परेश राऊत, सचिव संजय पिळणकर व जिल्हा पदाधिकारी सदस्यांनी दिल्या शुभेच्छा.
सिंधुदुर्ग | ब्युरो न्यूज : पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हाॅईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी आपा राणे तर सचिवपदी प्रतिक राणे यांची निवड करण्यात आली. व्हाॅईस ऑफ मिडिया संघटना भारतासह जगभरात ४१ देशांत सक्रीय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात, गेल्या या संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष परेश राऊत यांनी दोडामार्ग तालुकाध्यक्ष आपा राणे व सचिव प्रतिक राणे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हाईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष परेश राऊत, सचिव संजय पिळणकर, सहसचिव अमित पालव, उपजिल्हाध्यक्ष भूषण सावंत, कार्यकारणी सदस्य प्रथमेश गवस उपस्थित होते.
फोटो सौजन्य | दोडामार्ग ब्युरो.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)