ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
दोडामार्ग येथे श्रम संस्कार शिबिरात भूषण सावंत यांचे 'आरोग्य व आहार' विषयक मार्गदर्शन.

दोडामार्ग येथे श्रम संस्कार शिबिरात भूषण सावंत यांचे 'आरोग्य व आहार' विषयक मार्गदर्शन.

दोडामार्ग येथे श्रम संस्कार शिबिरात भूषण सावंत यांचे 'आरोग्य व आहार' विषयक मार्गदर्शन. 

Article image


संस्कृती व पारंपरिक आहार पद्धती जतन करायचे केले आवाहन. 


दोडामार्ग | ब्यूरो न्यूज : लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) श्रम संस्कार शिबिराच्या बौद्धिक सत्रात 'बदलती जीवनशैली व आरोग्य' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या बौद्धिक सत्राच्या अध्यक्षस्थानी व्हाइस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष भूषण सावंत उपस्थित होते, तर व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालय दोडामार्गचे डॉ. रामदास रेडकर, भिकेकोनाळ ग्रामस्थ श्री. गवस आणि प्राध्यापक संजय खडपकर उपस्थित होते.


अध्यक्षीय भाषणात भूषण सावंत यांनी सुदृढ आरोग्यासाठी संस्कृती व पारंपरिक आहार पद्धती जतन करायचे आवाहन केले. सध्या, बदलती जीवनशैली असली तरी सकस आहार, वेळेवर झोप आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

       

यावेळी डॉ. रामदास रेडकर यांनी बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम स्पष्ट केला आणि त्याविषयी तांत्रिक वैद्यकीय मार्गदर्शन केले.

     

या बौद्धिक सत्राला उपस्थित एनएसएसचे स्वयंसेवकांनी भूषण सावंत, डाॅ. रेडकर अशा मान्यवरांच्या मार्गदर्शक सूचनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स