ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दोडामार्ग तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी रत्नदीप गवस.

दोडामार्ग तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी रत्नदीप गवस.

प्रकाशन: 30 Apr 2025 01:56 PM
वाचन संख्या 126

दोडामार्ग | ब्यूरो न्यूज : दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी रत्नदीप गवस यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सचिव पदी संदेश बाबासाहेब देसाई, उपाध्यक्षपदी ऋषिकेश सिताराम धर्णे व महेश यशवंत लोंढे तर खजिनदारपदी समीर रोहिदास ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या नूतन कार्यकारणीची निवड प्रक्रिया मंगळवारी संपन्न झाली. यावेळी जिल्हा पत्रकार समितीचे सचिव बाळ खडपकर यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर उपस्थित होते. निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. चर्चेनंतर सर्वानुमते अध्यक्षपदी रत्नदीप गवस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर व निवडणूक निरीक्षक बाळ खडपकर यांनी रत्नदीप गवस व नवनिर्वाचित कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष रत्नदीप गवस, सचिव संदेश बाबासाहेब देसाई, उपाध्यक्ष महेश लोंढे व ऋषिकेश धर्णे, खजिनदार समीर ठाकूर, सदस्य प्रभाकर धुरी, संदीप देसाई, सुहास देसाई, वैभव साळकर, तेजस देसाई, पराग गावकर, गणपत डांगी, सुनील नांगरे, लखू खरवत, शंकर जाधव, गजानन बोंद्रे, ओम देसाई, साबाजी सावंत, राजेश देसाई, भिकाजी गवस, परब उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स