आचरे गावासाठी जादा विद्युत कर्मचारी मिळण्यासाठी अधिक्षक अभियंता कुडाळ यांच्याकडे मागणी.
आचरा | ब्यूरो न्यूज : वाढत्या वीज समस्यांचे निराकरण करण्यासाठी अपुऱ्या कर्मचारी वर्गाबाबत आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी कुडाळ विद्युत मंडळाचे अधिक्षक अभियंता यांची भेट घेऊन दोन वायरमन व एक लाईनमन कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, सदस्य पंकज आचरेकर आदी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात आठ महसूली गाव असलेल्या आचरे गावची लोकसंख्या पाच हजारांहून जास्त आहे.सदर गावची भौगोलिक स्थिती पाहता सद्यस्थितीत कार्यरत असलेले दोन वायरमन व एक लाईनमन या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे तातडीने वीज समस्या मार्गी लावण्यात अडथळा निर्माण होत आहे. त्याबाबत ग्रामस्थांची नाराजी कडे व्यक्त होत आहे. त्यामुळे वीज समस्या निवारणासाठी किमान अजून दोन वायरमन आणि एक लाईनमन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक्षक अभियंता यांनी सकारात्मकता दर्शविल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)