ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
फ्लाय९१ ची गोवा - सिंधुदुर्ग दरम्यान मोफत कोच सेवा.

फ्लाय९१ ची गोवा - सिंधुदुर्ग दरम्यान मोफत कोच सेवा.

प्रकाशन: 11 Jun 2025 09:40 PM
वाचन संख्या 88

कुडाळ | ब्यूरो न्यूज : फ्लाय९१ या गोवास्थित प्रादेशिक विमानसेवेने चिपी विमानतळावरून हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू केली आहे. ही सेवा आठवड्यातून चार वेळा उपलब्ध असून, सध्या सुरू असलेल्या सिंधुदुर्ग-पुणे मार्गासोबतच नवीन मार्गही प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहेत. प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर, आरामदायक आणि अखंड करण्याच्या उद्देशाने फ्लाय९१ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीने सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ ते गोवा (पणजी) दरम्यान मोफत कोच सेवा सुरू केली असून, त्यामुळे प्रवाशांना अंतिम स्थानापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर गोवा या भागांसाठी हवाई प्रवास अधिक सोयीचा आणि सुलभ होणार आहे. ही कोच सेवा फ्लाय९१ची टियर २ आणि टियर ३ शहरांना जोडण्याची कटिबद्धता दर्शविते.

“प्रादेशिक हवाई प्रवास अधिक सुलभ व त्रासमुक्त बनवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. गोवा मार्गे सिंधुदुर्ग विमानतळाशी जोडणाऱ्या या कोच सेवेची सुरुवात ही त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण आणि विचारपूर्वक पाऊल आहे,” असे फ्लाय९१चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी लाँचप्रसंगी सांगितले.

“सिंधुदुर्ग विमानतळ आणि गोवा यांच्यातील ‘लास्ट-माईल’ कनेक्टिव्हिटी ही लक्झरी कोच सेवेमुळे सुनिश्चित होत आहे. यामुळे पुण्यातील प्रवाशांना सहजतेने पणजीपर्यंत पोहोचता येईल, गोव्यातील प्रवाशांसाठी पुण्याकडे परत जाण्यासाठी विमानतळापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होईल. सुरुवातीच्या काळात ही सेवा ठरावीक कालावधीसाठी मोफत दिली जाईल आणि नंतर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यल्प शुल्कात उपलब्ध केली जाईल,” असे सिंधुदुर्ग विमानतळाचे मुख्य सल्लागार व प्रमुख कॅप्टन जयसिंग सदाना यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स