ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
तिवरे धरण दुर्घटनेप्रकरणी ४ ऑगस्टपूर्वी अहवाल सादर करा.

तिवरे धरण दुर्घटनेप्रकरणी ४ ऑगस्टपूर्वी अहवाल सादर करा.

प्रकाशन: 11 Jun 2025 09:48 PM
वाचन संख्या 42

राज्य मानवी हक्क आयोगाचे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.

तळेरे | ब्यूरो न्यूज : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना ४ ऑगस्ट २०२५ पूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

२ जुलै २०१९ रोजी झालेल्या या दुर्घटनेत १३ घरं वाहून गेली, ४५ घरं पाण्याखाली गेली, १३ गुरांचे गोठे, ३१ शेळ्या, ४० कोंबड्या आणि ४३५ एकर शेती नष्ट झाली. शासनाच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट बांधकामामुळे धरण फुटल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणी ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी ८ जुलै २०१९ रोजी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आयोगाने या प्रकरणी विशेष तपास समिती (SIT) नेमून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची त्वरित मदत देण्याचे, तसेच त्यांच्या वारसांना शासकीय नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन आयोगाने दिले आहे.

या प्रकरणी ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, मुंबई जनसंपर्क अधिकारी विजेंद्रसिंग पाटणकर, उपाध्यक्ष जनार्दन पवार, सचिव प्रा. गणेश गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले आहे.

या घटनेतील पीडितांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा दुर्घटनांना प्रतिबंध व्हावा, यासाठी संबंधित शासकीय यंत्रणा आणि आयोगाने तात्काळ आणि ठोस पावले उचलावीत, अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स