ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजपच्या किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभू यांची निवड.

भाजपच्या किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभू यांची निवड.

प्रकाशन: 28 Oct 2021 11:17 AM
वाचन संख्या 56

ब्युरो न्यूज | विवेक परब : भाजपा किसान मोर्चा च्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावचे बी. एस्. सी. ( कृषी) पदवीधर प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु यांना नियुक्ती पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते देण्यात आले .
कुडाळ MIDC विश्रामगृहामध्ये आयोजित भाजपा किसान मोर्चाची पदाधिकारी निवडीची बैठक किसान मोर्चा चे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी आयोजित केली होती .
या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली , महिला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे , संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , जिल्हा सरचिटणीस व किसान मोर्चा संयोजक प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई , जेष्ठ नेते विलासजी हडकर , जि.का.का.सदस्य बाळा सावंत , ज्ञानेश्वर केळजी , जि.चिटनीस बंड्या सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी जिल्हा सरचिटणीस , जिल्हा उपाध्यक्ष , जिल्हा चिटनीस , महिला संयोजक तसेच १४ मंडलाच्या अध्यक्षांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली .
यावेळी मान्यवरांची सर्व नवनिर्वाचित पदाधिकारयांना शुभेच्छा देताना किसान मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरयांना शासनांच्या योजनांचा फायदा मिळवुन देण्याचे आवाहन करण्यात आले .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स