पणदूरच्या आनंदाश्रय मधील रुग्णांसाठी वराड कुसरवे येथील आभाळमाया समूहाचा मदतीचा हात..!
चौके |अमोल गोसावी : मालवण तालुक्यातील आभाळमाया वॉट्सप समूहाचे सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा नगरपालिका शाखा अधिकारी जयंत जावडेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना पणदूर येथील आनंदाश्रय या आश्रमातील निराधार रुग्णांसाठी पाच हजार रुपये किंमतीची औषधे मोफत उपलब्ध करून दिली. सदर औषधे आभाळमाया गृपचे सदस्य राकेश डगरे आणि समीर रावले यांनी बुधवारी आनंदाश्रयच्या व्यवस्थापकांकडे सुपूर्द केली.
जुलै २०२१ मध्ये स्थापन झालेल्या वॉट्सप गृपने गेल्या चार महिन्यात अनेक सामाजिक , शैक्षणिक , आरोग्यविषयक उपक्रम राबवून समाजासमोर अनेक आदर्श ठेवले आहेत. त्यांच्या या कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)