ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दोन्ही जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावायचा प्रमोद जठार यांचा विश्वास.

दोन्ही जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावायचा प्रमोद जठार यांचा विश्वास.

प्रकाशन: 28 Oct 2021 11:05 AM
वाचन संख्या 33

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी विकासाला गती दिल्याची माहिती…

ब्युरो न्यूज | विवेक परब : कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विकासाची प्रलंबित कामे व रखडलेले प्रकल्प केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. दहा वर्षाचे अथक प्रयत्न व पाठपुराव्यानंतर कोकिसरे रेल्वे फाटक भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात होत आहे. भुयारी मार्गाचे काम हे स्थानिक जमीन मालकांना विश्वासात घेऊन होणार आहे. जमीन मालकांवर अन्याय होणार नाही. असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
कोकिसरे रेल्वे फाटक येथे मंजूर असलेल्या भुयारी मार्गाच्या संयुक्त जमीन मोजणी कामाचा शुभारंभ कोकिसरे येथे माजी आ. प्रमोद जठार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वैभववाडी भाजपाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, सज्जनकाका रावराणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, कोकिसरे सरपंच दत्‍ताराम सावंत, रोहन रावराणे, संजय सावंत, प्रदीप नारकर, किशोर दळवी, दाजी पाटणकर, सुनील रावराणे, प्रकाश पांचाळ, प्रदीप जैतापकर, राजू पवार, अवधूत नारकर व ग्रामस्थ, जमीन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जठार म्हणाले, या रेल्वेमार्गावरून दर दिवशी साठ गाड्या ये – जा करतात. त्यामुळे तब्बल नऊ ते दहा तास फाटक बंद करावा लागतो. कोल्हापूरला जाण्यासाठी किंवा आजारी, गरोदर मातांना या फाटकाचा नेहमी त्रास सहन करावा लागतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे या कामाचा आम्ही सतत पाठपुरावा केला. केंद्राने या कामाला तब्बल 65 कोटी दिले आहेत. हळवल उड्डाण पुलाचा वाईट अनुभव लोकप्रतिनिधींना होता. त्यामुळे येथे सर्व नियोजनबद्ध परवानग्या मिळविण्यात आम्ही यशस्वी झालो असे जठार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मोजणी झाल्यानंतर टेंडर प्रोसिजर होईल, व फेब्रुवारी-मार्च महिन्यात भुयारी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी काही जमीन मालकांनी आपल्याला मोजणीच्या नोटीस आल्या नसल्याचे सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स