कुडाळ एसटी बस आगारात दाखल होणार ५ नवीन लालपरी.
आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश.
कुडाळ | प्रतिनिधी : कुडाळ एस. टी. बस आगारामध्ये नव्या लाल परी गाड्या याव्यात अशी गेले अनेक दिवस मागणी होत होती. आमदार निलेश राणे यांनी ही मागणी काही दिवसातच पूर्ण केली आहे. त्यामुळे एस. टी. बस आगाराला सोमवार, ९ जून पर्यंत ५ लाल परी गाड्या मिळणार आहेत.
एस. टी. बस महामंडळाने नव्या लालपरी गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केल्या. या गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, मालवण, या आगाराला मिळाल्या होत्या. या गाड्या कुडाळ आगाराला मिळाव्यात म्हणून मागणी होत होती. याबाबत आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले होते. या गाड्या तात्काळ मिळाव्यात म्हणून आमदार निलेश राणे यांनी प्रयत्न केले आणि लालपरी गाडी कुडाळ आगाराला तात्काळ देण्यात आल्या. या गाड्या सोमवार ९ जून पर्यंत कुडाळ एस. टी. बस आगारात दाखल होणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)