ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते 'शिवराज भूषण' महानाट्याचा शुभारंभ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते 'शिवराज भूषण' महानाट्याचा शुभारंभ.

प्रकाशन: 07 Jun 2025 08:48 PM
वाचन संख्या 35

मालवण | ब्यूरो न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजाश्रय दिलेले कवी भूषण यांच्या जीवनावर आणि त्यांनी लिहिलेल्या शिवराज भूषण या काव्यावर आधारित श्री शिवराज मंच मालवण यांनी निर्मित केलेल्या आणि मालवणमधील कलाकारांनी आपल्या अभिनयातून साकारलेल्या ‘शिवराज भूषण’ या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार, ०६ मे रोजी मालवणमधील मामा वारेरकर नाट्यगृहात सादर झाला.

या महानाट्याचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होऊन त्यांनी या महानाट्यासाठी कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत या महानाट्याच्या पुढील वाटचालीस आवश्यक ती मदत आपण करू, अशी ग्वाही दिली.

यावेळी आमदार निलेश राणे, सुधीर थोरात यांच्यासह पंकज भोसले, लेखक रणजित हिर्लेकर, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, सौ. शिल्पा खोत, हेमंत कोळंबकर यांचा सत्कार करण्यात आला. तर किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती व किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या वतीने निर्माते भूषण साटम यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी भूषण साटम यांनी नाटकाविषयी माहिती देताना कवी भूषण यांचे शिवराज भूषण हे काव्य महाराष्ट्रात काहीसे दुर्लक्षित राहिले, हे काव्य व त्यात मांडलेला शिवरायांचा इतिहास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे सांगितले.

शिवराज्याभिषेक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवराज भूषण या महानाट्याच्या शुभारंभ प्रसंगी शिवशंभू मंचचे महाराष्ट्र प्रांत संयोजक सुधीर थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, रुपेश मोरे, शिवव्याख्याते पंकज भोसले, किल्ले विजयदुर्ग समितीचे अध्यक्ष राजीव परुळेकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे लवू महाडेश्वर, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे, निर्माते भूषण साटम, नाटकाचे लेखक रणजित हिर्लेकर, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, भाऊ सामंत, समीर शिंदे, संजय शिंदे आदी उपस्थित होते.

या प्रयोगाला नाट्य रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स