मालवण पत्रकार समितीतर्फे पत्रकार सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुका पत्रकार समितीच्या पत्रकार सदस्य पाल्यांचा (दहावी व बारावी) सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. मालवण शासकीय विश्रामगृह येथे ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यात बारावी परीक्षेत तृप्ती संतोष गावडे आणि दहावी परीक्षेत धृती केशव भोगले, खुशी प्रशांत हिंदळेकर, सिद्धी संतोष हिवाळेकर यांचा भेटवस्तू, रोपटं आणि प्रमाणपत्र देऊन गौरव सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात पत्रकार संघाचे सदस्य पी. के. चौकेकर यांचा चौके सरपंच पद नियुक्ती तर संग्राम कासले यांची कोळंब पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते भेटवस्तू, रोप व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, माजी अध्यक्ष संतोष गावडे, ज्येष्ठ पत्रकार पी. के. चौकेकर, उपाध्यक्ष विशाल वाईरकर, उपाध्यक्ष परेश सावंत, सहसचिव नितीन गावडे, मनोज चव्हाण, समीर म्हाडगूत, संग्राम कासले, भूषण मेतर, भाऊ भोगले, संतोष हिवाळेकर, उदय बापर्डेकर, आप्पा मालंडकर, ओंकार यादव यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.
मालवण पत्रकार समिती नेहमीच आपल्या कुटुंबातील पत्रकार सदस्यांच्या मुलांच्या नेहमीच पाठीशी असून आजचा सत्कार हा पत्रकारांच्या पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच आयोजित करण्यात आल्याचे मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.
नंदकिशोर महाजन यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून करण्यात येणारे कौतुक नेहमीच प्रोत्साहन देणारे ठरत असते, पत्रकार पाल्यांनी यापुढेही चांगले यश मिळवावे, तसेच सत्कार केलेल्या पत्रकारांनीही आपापल्या कार्यक्षेत्रात पुढची मजल गाठावी, सांगितले.
सत्काराला उत्तर देताना संग्राम कासले व चौके सरपंच पी. के. चौकेकर आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने कु. तृप्ती आणि कु. सिद्धी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पाल्यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव कृष्णा ढोलम यांनी केले आणि सहसचिव नितीन गावडे यांनी आभार प्रदर्शन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)