ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळ येथे ७ जून रोजी शिष्यवृत्ती - शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम.

कुडाळ येथे ७ जून रोजी शिष्यवृत्ती - शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम.

प्रकाशन: 04 Jun 2025 03:08 PM
वाचन संख्या 56

आई वडिलांचे छत्र हरपलेल्या तसेच वडिल अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या गरीब परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या निवडक १३४ विद्यार्थ्यांना मदत.

माझा सिंधुदुर्ग विकास संस्था (रजि.) व संलग्न माझा सिंधुदुर्ग गृप यांच्या उपक्रमाचे पाचवे वर्ष.

कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ येथे ७ जून रोजी शिष्यवृत्ती – शैक्षणिक साहित्य वितरण होत आहे. माझा सिंधुदुर्ग विकास संस्था (रजि.) व संलग्न माझा सिंधुदुर्ग गृप यांचा हा उपक्रम आहे,

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आई – वडिलांचे छत्र हरपलेल्या गरजू , होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. आत्तापर्यंत उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व तालुक्यातून ३०० पेक्षा अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पोहोचवली आहे अशी माहिती मिळत आहे.

यावर्षीचा शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक ७ जून २०२५ रोजी सकाळी १०:०० ते १:०० या वेळात मराठा समाज हॉल , कुडाळ या ठिकाणी संपन्न होत आहे.

आई वडिलांचे छत्र हरपलेल्या व वडील अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या गरीब परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या निवडक १३४ विद्यार्थ्यांना यावेळी संपूर्ण वर्षासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य ( दप्तर, वह्या, कंपास पेटी, पेन पेन्सिल सेट, रंगपेटी, परीक्षा पॅड, पाणी बॉटल, भौमितिक संच इत्यादी) मोफत बहाल केले जाणार आहे.

या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना मदत पोहोचवण्यास सहकार्य करावे असे आवाहन माझा सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष विकास सं. पालव यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स