आमदार निलेश राणेंची भूमिका निर्णायक ठरली…!
अग्निशमन केंद्र इमारत पूर्णत्वाच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची प्रतिक्रिया.
आ. निलेश राणेंच्या माध्यमातून अग्निशमन कामासाठी प्रशिक्षीत शासकीय स्तरावरील पदे भरली जातील असा व्यक्त केला विश्वास.
मालवण | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजना अग्निशमन सेवा बळकटी अंतर्गत सुमारे २ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या मालवण अग्निशमन केंद्र इमारत लोकार्पण ५ जून रोजी होत आहे. या इमारतीच्या पूर्णत्वासाठी आमदार निलेश राणे यांची भूमिका निर्णायक ठरली प्रतिक्रिया मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.
याबाबत आगामी काळात माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी अग्निशमन कामात प्रशिक्षित शासन स्तरावरील पदे भरतीचे काम आमदार निलेश राणे प्राधान्याने करतील असा विश्वास देखिल व्यक्त केला आहे
मालवण शहर हे सध्या पर्यटन शहर म्हणून नावारूपाला येत आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नागरिक आर्थिक गुंतवणूक करून आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे . हॉटेल , वॉटर स्पोर्ट्स यासाठी लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करीत आहेत. विविध विकासक वाणिज्य वनिवासी अशा बहुमजली इमारती बांधत आहेत. त्यामुळे पर्यटक, मालवण शहरातील नागरिक यांच्या जीविताचे, मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सुविधा पुरविणे या एकमेव हेतूने अग्निशमन केंद्राच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती . परंतु लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ २०२१ ला संपल्यावर या कामाची गती मंदावली होती. याबाबत सातत्याने सूचना करूनही या कामाकडे गांभीर्याने बघितले गेले नाही असे श्री. कांदळगांवकर यांनी सांगितले आहे.
कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला गती प्राप्त झाली आणि पुढच्या सहा महिन्यातच हे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. त्यामुळे याकामाचे श्रेय हे आमदार निलेश राणे यांचेच आहे असेही माजी नगराध्यक्ष कांदळगांवकर यांनी सांगितले आहे. याचसोबत, अग्निशमन हा शहराच्या दृष्टीने संवेदनशील विषय असताना , निधीची उपलब्धता असताना प्रशासक आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे या कामाला पाच वर्षाचा कालावधी लागला आहे खंत त्यांनी प्रसिद्धी पत्रात मांडली आहे.
मालवण नगरपरिषदेच्या या कामाबाबत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याबाबत आमदार राणे निर्णय घेतील यात शंका नाही. कारण आमदार निलेश राणे यांनी देशाच्या सर्वोच्च अशा संसदेत खासदार म्हणून काम केल्यानंतर फक्त मालवण कुडाळ मतदार संघाचा विकास हे व्हिजन घेवून आमदार म्हणून निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांना त्यांचा स्वप्नवत असा मतदार संघ बनविण्यासाठी ते नक्कीच प्रयत्नशील आहेत. फक्त अग्निशमन केंद्रासाठी मालवण नगरपालिकेच्या स्टाफ पॅटर्नमध्ये स्टाफ मंजूर आहे. तो स्टाफ भरण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे जेणेकरून हे अग्निशमन केंद्र लवकरात लवकर सुरु होईल, माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)